Home गडचिरोली अहेरी उपविभागातील समस्यांबाबत तालुका पत्रकार संघटना व संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे वनमंत्र्यांना...

अहेरी उपविभागातील समस्यांबाबत तालुका पत्रकार संघटना व संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे वनमंत्र्यांना साकडे 

80

अहेरी उपविभागातील समस्यांबाबत तालुका पत्रकार संघटना व संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे वनमंत्र्यांना साकडे

 

वार्ताहर ….

अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची बकालावस्था, महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन, वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध्य कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त जंगल व्याप्त व मागास अहेरी विभागाकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध समस्या निवारणासाठीचा पुढाकार तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वात पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संतोष भाऊ ताटीकोंडावार यांचे राज्याचे वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदनातून विनंती केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात चालू असलेल्या विकास कामांची गती अतिशय मंद आहे. राजनगरी म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात ठसा निर्माण करणारी आहेरीची विकासगंगा ग्रामपंचायत पासून नगरपंचायतीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात गतिशील नाही. जिल्हा दारूबंदी असला तरी दारू न मिळणारे गाव शोधून सापडणे कठीण असल्याने येथील बेरोजगारीच्या खाईत असलेल्या नागरिकांना व्यसनाचे ग्रहण लागले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच वनविभागातील बहुतेक कामांची अवैधता, बांधकाम विभागातील रस्त्यांबाबत दुर्लक्षता लक्षात घेता राज्याचे वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समस्यांच्या निवारण्या करता पुढील महिन्यात दौरा करणार असल्याचे संकेत तालुका पत्रकार संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले.

सोबतच यापूर्वी अहेरी उपविभागातील सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाची अवैध बांधकामांची कुंडलिच जिल्हा भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी मांडल्याने सुद्धा वनमंत्र्यांनी त्याची दखल नक्कीच घेण्याचे त्यांना आश्वासन दिले.

Don`t copy text!