NSUI गोंदिया तर्फे ,NSUI चा ५४वा स्थापना दिवस उत्साहात साजरा!!* *!! राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व सरचिटणीस शिवानी ताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

66

*!! NSUI गोंदिया तर्फे ,NSUI चा ५४वा स्थापना दिवस उत्साहात साजरा!!*

 

 

*!! राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व सरचिटणीस शिवानी ताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती !!*

——————————————————————————–

*दिनांक: ०९ एप्रिल २०२३*

*गोंदिया*

 

 

*एनएसयुआयचा ५४ वा स्थापना दिवस गोंदिया येथील कार्यालयात माजी मंत्री विजयजी वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आदरणीय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर युवकांना सोबत घेत राज्यात वाढत असलेल्या महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.*

 

*युवक काँग्रेस सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांनी स्वतः आज काही युवक युवतींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. गोंदिया परिसरात उत्पन्नाचे कमी असलेले स्रोत, सुशिक्षित युवकांना संधीचा अभाव, वाढती महागाई आणि रोजगाराचे अनेक प्रश्न आज त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून भीषण वास्तव समोर आलंय. अनेक युवकांना रोजगार नसल्याने त्यांच्या कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट होत जात आहे. तरुणांपुढे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्याचे, शिक्षणाचे प्रश्न उभे राहिले आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील अवघड झाले आहे.*

 

*या विदारक परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एनएसयुआयचा ५४ वा स्थापना दिवस साजरा करत असताना गोंदिया शहरात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं. अनेक युवक या गंभीर परिस्थितीतून जात असल्याने उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी होत ते या आंदोलनाचा आवाज बनले.*

 

*यावेळी आमदार सहसराम कोरोटे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हा प्रभारी अश्विन बैस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा बागडे, #NSUI जिल्हा अध्यक्ष हरीश तुळसकर, कविताताई कापगते, चागुताई उईके, छायाताई नागपुरे, श्रीकांत गटबांधे, आशिष कापगते, आलोक मोहंती, निशांत राऊत, राजा कोरोटे आदी उपस्थित होते* .