गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात मतदान जाणीव जागृती करण्या करीता विविध उपक्रमांचे आयोजन

41

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात मतदान जाणीव जागृती करण्या करीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांना संवैधानिक कायदेशीर तरतुदीबाबत माहिती देणे , निवडणूक आयोग , न्यायव्यवस्था ,प्रसारामध्ये यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याबाबत माहिती देणे , निवडणूक प्रक्रियेबाबत अवगत करणे तसेच महिला , वृद्ध , महाविद्यालयीन विध्यार्थी आदी घटकांमध्ये मतदान बाबत जागृती निर्माण करण्याचे काम स्वीप च्या माध्यमातून केले जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विध्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत १०० टक्के सहभाग असावा, मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी , सक्षम लोकशाही साठी सर्वानी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजवावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव , जागृती निर्माण करण्याच्या हेतूने स्वीप हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रत्येक बालक हा त्यांच्या पालकांचा लाडका असतो त्यामुळे त्यांच्या आग्रहाला किंवा आवाहनाला पालक संमती देतातच , हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालूक्यातील श्री विजय संस्कार यांच्या संकल्पनेतील संस्कार पब्लिक स्कूल या उपक्रमशील शाळेच्या विध्यार्थ्यांद्वारे संकल्प पत्र भरून घेतले जात आहे.

यातील संदेशानुसार विध्यार्थ्यानी आपल्या पालकांना माननीय जिल्हाधिकारी महोदय गडचिरोली तथा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी दिलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिलेल्या पत्रानुसार निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडूणुक आयोगाकडून सिस्टिमॅटिक वोटर्स एजूकेशन अँड इलेकट्रोरेल पार्टीसिपेशन (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अतंर्गत माननीय गट शिक्षणाधिकारी श्री कुमरे सर पंचायत समिती शालेय विभाग एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून पालकांसाठी संकल्प पत्र भरून घेत, त्यांना त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली तर्फे करण्यात येत आहे. याधीही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्राअंतर्गत संस्कार पब्लिक स्कूल तालुक्यात अव्वल आलेली होती हे विशेष.