गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वाखाली गुडीपाडव्यास मराठमोळ्या वेशभूषेत निघाली महिलांची स्कुटी रॅली

35

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वाखाली गुडीपाडव्यास मराठमोळ्या वेशभूषेत निघाली महिलांची स्कुटी रॅली

 

हिंदू संस्कृतीने विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवन पद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृती ने ठरवून दिलेल्या वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात व्हावी या २०१७ पासून आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात गुढीपाडव्यास मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची स्कुटी रॅली काढण्यास सुरुवात केली. यावर्षी सुद्धा आधारविश्व फाऊंडेशन व नारी शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संस्कृतीची माहिती व ओळख नवीन पिढीला करून द्यावी याच विचाराने प्रेरित होऊन गडचिरोलीला गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नऊवारी पातळ, नथ घालून अस्सल मराठी वेशभूषे मध्ये सोमवारी दिनांक 8 एप्रिल 2024 ला सायंकाळी पाच वाजता महिला स्कुटी रॅली काढण्यात आली. भारत माता की जय , जय श्रीराम, फूल नही चिंगारी है हम भारत की नारी है असा जयघोष करीत रॅलीने संपूर्ण गडचिरोली शहर दुमदुमून गेले रॅलीला गडचिरोली जिल्हा संघचालक माननीय घिसुलाल काबरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली.

कोणतेही शास्त्र किंवा इतिहास नसताना केवळ पाश्चात्यांचे अंधानूकरण करून 31 डिसेंबर या दिवशी बरेच लोक नवीन वर्ष साजरे करतात, आपल्या उज्वल संस्कृतीला विसरून सोज्वळ स्वरूपाचे हिंदू सण विसरून कर्णकर्कश आवाज करणारे डीजे लावून दारूच्या व मटणाच्या पार्ट्या करून मदय धुंद अवस्थेत नवीन वर्षाचा प्रारंभ योग्य वाटतो काय? पाश्चात्यांच्या अंधाणूकरणामुळे आपली संस्कृती लोप पावत असून येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे,त्या मुळे समाज मनात हिंदू संस्कृती चे महत्व रुजऊन देणे नितांत गरजेचे आहे , म्हणूनच स्कुटी रॅली चे प्रयोजन.

महिला स्कुटी रॅलीला दरवर्षी गडचिरोलीत बहुसंख्य प्रमाणात महिला पारंपारिक वेशभूषेत सामील होतात व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करतात. सर्वांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना आप्तेष्टांना शेजारीपाजाऱ्यांना गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज होऊया असा संकल्प यावेळी केला.

रॅलीमध्ये गीता हिंगे, माणिक ढोले,उज्वला वालोदे,सुनीता साळवे, डॉ चंदा कोडवते, वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार, सुनिता आलेवार, माधुरी दहिकर,अनघा भुसारी, भारती तारगे,प्रणाली मुनघाटे,प्रतिमा सोनवणे,संगीता राऊत,स्मिता खटी,स्मिता भांडेकर,शिल्पा हेमके,अलका माटेटवार, दिपाली काथोटे,तिलोत्तमा हाजरा, रंजना भांडेकर संगीता वरगंटीवार, निर्मला कोट्टावार, लक्ष्मी कलंत्री तसेच गडचिरोलीच्या बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.