*युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करून इतरांना प्रोत्साहित करावे.*

20

*युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करून इतरांना प्रोत्साहित करावे.*

_जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे आवाहन_

—————————————–

_जिल्हा स्टेडियम येथे घेतली नव मतदार युवा वर्गांची भेट._

—————————————-

 

गडचिरोली :- युवा वर्ग हे देशाचे भविष्य आहे. निवडणूक प्रक्रियेत युवा वर्गाने सक्रीय होवून आपले योगदान दयावे. येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करुन इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी नव मतदार युवा वर्गांना केले.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा. घरातील १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यास प्रोत्साहित करावे. ज्येष्ठ असलेल्या आजी-आजोबांना तसेच शेजारच्या व्यक्ती, मित्र मंडळींना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदानाचे महत्व पटवून देवून त्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येण्यास प्रोत्साहित करावे. असे जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे युवा वर्गा सोबत बोलताना सांगितले.

 

युवा वर्ग देशाचा कना आहे. देश जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर जात आहे.या मध्ये युवा वर्गाचा खूप मोठा योगदान आहे. देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरिता पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आव्हान जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी युवा वर्गांना केले.

 

त्याप्रसंगी आमदार डॉ रामदासजी आंबटकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष लीलाधरजी भरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष कुणाल चिंगीलवार कार्यकर्ते व नव मतदार युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.