Home गडचिरोली लोकवर्गणीच्या बळावर साकारतो मंदिर विकास; इंदिरानगर मध्ये हनुमान मंदिर वॉल कंपाऊंड भूमिपूजन...

लोकवर्गणीच्या बळावर साकारतो मंदिर विकास; इंदिरानगर मध्ये हनुमान मंदिर वॉल कंपाऊंड भूमिपूजन उत्साहात!

28

लोकवर्गणीच्या बळावर साकारतो मंदिर विकास; इंदिरानगर मध्ये हनुमान मंदिर वॉल कंपाऊंड भूमिपूजन उत्साहात!

 

बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

 

गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरानगर प्रभाग क्रमांक ३ येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेल्या हनुमान मंदिराच्या वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने साकार होत असलेल्या या उपक्रमामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व सुरक्षितता वाढणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

या प्रसंगी बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर (न.प.) तथा अध्यक्ष, हनुमान सेवा समिती इंदिरानगर व नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात मंदिर परिसराच्या विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या लोकवर्गणीचे कौतुक करत, समाजाच्या एकोप्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. धार्मिक स्थळांच्या विकासातून सामाजिक एकात्मता अधिक दृढ होते, असेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी राजू बोबाटे, देवानंद खोब्रागडे, गजू विरवार, शंकर चिलबुले, संजय पिपरे, सुजित मेश्राम, राहुल गिरसावळे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी कार्यक्रम पार पडला.

 

मंदिर परिसरात उभारण्यात येणारे वॉल कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या या बांधकामामुळे इंदिरानगर परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळणार आहे.

 

संपूर्ण कार्यक्रम उत्साह, एकोपा आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला.

Don`t copy text!