गोगाव ग्रामपंचायत कडून झोपडी दुरुस्तीसाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत

140

गडचिरोली:- तालुक्यातील गोगाव ( टोली ) वार्ड क्र.1 येथील श्री मुकुंदा शेडमाके यांची आर्थिक परिस्थिती खुपच बिकट असल्यामुळे त्यांना झोपडी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालय गोगाव कडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरपंच राजु उंदिरवाडे, उपसरपंच निलेश दाकोटे, सचिव मेश्राम साहेब तसेच ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या उपस्थितीत देण्यात आली.