धान खरेदी मर्यादा २०क्विंटल करण्यासाठीं आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव

169

धान खरेदी मर्यादा २०क्विंटल करण्यासाठीं आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव

जिल्हयातील सर्वसामान्य शेतकरी वनहक्क व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे केले नेतृत्व

प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता केले आंदोलन

एकरी २० क्विंटल धान खरेदी मर्यादेसह, वनहक्क व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी केला घेराव

दिनांक ३० जानेवारी २०२१
गडचिरोली

गडचिरोली :- जिल्हयातील सर्वसामान्य शेतकरी ,वनहक्क व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घेराव घालून आंदोलन करण्यात आले .यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव , भाजपा नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
हे आंदोलनं करण्यात येवू नये याकरिता प्रशासनाने सूचना केली. आंदोलन दडपण्यासाठी जागोजागी पोलीस बॅरिकेट्स लावून शेतकऱ्यांना आंदोलनं स्थळापर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला. आमदारांसह काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याची योजनाही आखण्यात आली परंतु या सर्वाँना न जुमानता आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव, भाजपा नेते ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करण्यात यावी, वनहक्क व अतिक्रमण धारक शेतक-यांना धान खरेदीसह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा , बंद अवस्थेत असलेले बोगस इले्ट्रॉनिक्स वजन काटे बदल करून चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स वजनी काटे उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच धान खरेदीच्या प्रक्रियेला गती देवून शेतक-यांना होणारा त्रास दुर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी करण्यात आले असुन पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले आहे परंतु मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलनं पुढे करण्यात येइल असा इशारा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी राज्य सरकारला दिला आहे.